Share

आधी पुणे आता सोलापुरात Walmik Karad च्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची मोहमाया, पुराव्याने खळबळ

by MHD
Walmik Karad Wife Jyoti Jadhav Property in Solapur

Walmik Karad । खंडणीप्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर (Walmik Karad bail hearing) कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परंतु, त्याच्या संपत्तीबाबत (Walmik Karad Property) आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर पुरावा सादर करण्यात आला आहे. वाल्मिक कराडकडे करोडो रुपयांची संपत्ती असून त्याने ही संपत्ती आपली पत्नी, मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याने विदेशात देखील गुंतवणूक केली आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती.

वाल्मिक कराडने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्येही संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jyoti Mangal Jadhav Property in Solapur

अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत दावा केला आहे. “वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव असल्याचे काही माध्यमांनी दाखवले आहे. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव (Jyoti Mangal Jadhav) आहेत का? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे ४ सातबारे आहेत. ह्या ज्योति मंगल जाधव कोण आहेत? ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील तपास झाला पाहिजे,” अशी मागणी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पोस्टद्वारे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Walmik Karad has assets worth crores of rupees and information has come to light that he has kept this wealth in the name of his wife, children and relatives.

Maharashtra Crime Marathi News