Share

Walmik Karad ला मिळणार बेल? आज होणार जामीन अर्जावर महत्त्वाची सुनावणी

The CID has requested the court not to grant bail to Walmik Karad as he is to be interrogated in the Santosh Deshmukh murder case.

by MHD

Published On: 

Walmik Karad Bail Hearing

Walmik Karad । खंडणीप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या सुनावणीकडे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) कुटुंबीय आणि कराड समर्थकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (Santosh Deshmukh murder case)

आज कोर्टात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, केज कोर्टामध्ये पार पडलेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच त्याने कोर्टात जामीनासाठी अर्ज देखील दाखल केला होता.

पण आता या अर्जाला सीआयडीकडून आव्हान देण्यात आले आहे. कराडची संतोष देशमुख हत्याप्रकरणात चौकशी करायची असल्याने त्याला जामीन देऊ नये, अशी विनंती सीआयडीने कोर्टात केली आहे. यावर आज कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. तसेच एसआयटी आज धक्कादायक खुलासे करू शकते.

Hearing of Walmik Karad Bail

त्यामुळे आता कोर्ट वाल्मिक कराडला जामीन मंजूर करणार की सीआयडीची मागणी मान्य करणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर वाल्मिक कराड याला जामीन मिळाला नाही तर पुन्हा एकदा त्याचे समर्थक गदारोळ घालू शकतात. तसेच जामीन मिळाला तर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण पेटू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही