Share

“राजीनामा द्या, तुम्ही त्या कंपनीत शेअरहोल्डर…”; Anjali Damania यांचा मुंडेंवर खळबळजनक आरोप

by MHD
Anjali Damania demanded Dhananjay Munde resignation

Anjali Damania । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी (Dhananjay Munde resignation) त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्टद्वारे केली आहे.”वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सरव्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. ह्यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते ? Mahagenco ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची wholly owned subsidiary आहे. असे असतांना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

एकीकडे अंजली दमानिया यांनी पुरावे सादर करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गट आणि राज्य सरकार अजूनही राजीनामा का घेत नाही? असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात पडला आहे.

Anjali Damania demand Dhananjay Munde resignation

दरम्यान, शिर्डीमध्ये आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन (NCP Shirdi programme) पार पडणार आहे. पण या अधिवेशनाला धनंजय मुंडे हे येणार नाहीत. धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत आराम करणार आहेत अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Social activist Anjali Damania has also taken an aggressive stance on Dhananjay Munde resignation from the beginning.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now