Santosh Deshmukh । 9 डिसेंबर रोजी मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून (Santosh Deshmukh murder case) करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टाने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या सहा आरोपींवर मकोका (Macoca) लावला. आता पुन्हा एकदा या आरोपींबाबत कोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
कोर्टाने आता या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज बीड न्यायालयात त्यांना व्हिसीद्वारे हजर केले होते. जरी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असली तरी त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवले जाणार आहे.
इतकेच नाही तर वाल्मिक कराड (Walmik Karad) च्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी ही सुनावणी होणार होती. त्याला देखील खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Santosh Deshmukh murder case judicial custody six accused
तसेच, वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याने त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. सातत्याने ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे राजीनामा देतात की तसेच पदाला चिकटून राहतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :