Sandeep Kshirsagar । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी मंत्रिमंडळात असणाऱ्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत त्यांचा राजीनामा मागत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) याला अटक होण्यास उशीर झाला. तोच या प्रकरणात मास्टरमाईंड आहे. शिवाय त्याला धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे,” असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यापूर्वीही संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर अजित पवार गट आतातरी त्यांचा राजीनामा घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde
पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID ने आता वाल्मिक कराड नाही तर सुदर्शन घुले याला गँगचा मुख्य सूत्रधार दाखवलं आहे. तसेच कराडला या गँगचा सदस्य दाखवलं आहे. CID च्या खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :