Narayan Rane । खासदार नारायण राणे सतत विरोधकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून टीका करत असतात. पण आता त्यांनीच महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे महायुतीत काही आलबेल आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
“मराठा आरक्षणास (Maratha Reservation) आपला विरोध नसून या समाजास स्वतंत्र आरक्षण द्यावे, असा दावा ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) करत असतात. पण प्रत्याक्षात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रस्ताव आला त्यावेळी त्यांनीच विरोध केला होतो, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे.
त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्याशिवाय राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज विरुद्ध छगन भुजबळ (Maratha vs Chhagan Bhujbal) असा संघर्ष देखील पाहायला मिळू शकतो.
Narayan Rane vs Chhagan Bhujbal
दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनेकदा त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. पण आज त्यांनी शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थित राहून नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :