🕒 1 min read
Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटून गेला तरीही एक आरोपी अजून मोकाटच आहे. कोर्टाने आज मकोका लावलेल्या सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच वाल्मिक कराड (Walmik Karad) च्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलत त्याला देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अशातच आज अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना त्या भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी एक घोषणा देखील केली आहे.
“संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडे बघून मला माझे जुने 16 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. यांच्याच्यासाठी मला काही करता आलं तर मी नक्की करेन. माझी जमीन आंबेजोगाईला आहे. सध्या तीची केस लढत असून मला त्या जमिनीतून त्यांना काही देता आले तर मी ते त्यांना नक्की देईन,” असे सारंगी महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
Sarangi Mahajan Big announcement
तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. “वाल्मिक कराडचं कनेक्शन धनंजय मुंडेंसोबत म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,” अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “Chhagan Bhujbal यांनी मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणण्यास विरोध..”; Narayan Rane यांचा खुलासा
- Santosh Deshmukh हत्याप्रकरणातील मकोका लावलेल्या ‘त्या’ आरोपींना कोर्टाचा पुन्हा धक्का, घेतला मोठा निर्णय
- बिग ब्रेकिंग! Walmik Karad च्या जामीन अर्जावरील सुनावणी रद्द, ‘इतके’ दिवस होणार जेलवारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now