Share

काय सांगता! दातांमुळे देखील होऊ शकतो Cancer? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

by MHD
Teeth can cause cancer

Cancer । कॅन्सर हा एक गंभीर आजार असून यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. हल्ली दाताचे आजार खूप वाढले आहेत. दातांमुळे देखील कॅन्सर (Cancer Cause) होतो, असे बोलले जाते. यावर तज्ज्ञांचे काय मत आहे जाणून घ्या.

डॉक्टरांच्या मतानुसार, तोंडाची स्वच्छता आणि दातांची काळजी नियमितपणे घेतली नाही तर हिरड्यांमध्ये जळजळ होण्यास सुरुवात होते. संसर्ग झाला तर दीर्घकाळ जळजळ होऊ लागते. असे झाले तर आपल्या त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान होऊन कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरचा धोका सर्वाधिक असतो. (Causes of Cancer)

विशेष म्हणजे जे लोक तंबाखू, सुपारी तसेच अति प्रमाणात मद्यपान करतात त्यांचे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यास हानी पोहोचते. या सवयी केवळ हिरड्या कमकुवत करत नाहीत तर कॅन्सर होण्यास देखील कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंना जन्म देतात. डॉक्टरांचे असे मत आहे की, या गोष्टी चघळल्या तर काहीवेळा गालाच्या आतील भागात कट होऊन कॅन्सर होऊ शकतो.

जाणून घ्या लक्षणे (Cancer symptoms)

  • तोंडाच्या आत पांढरे किंवा लाल ठिपके असणे.
  • चघळण्यात किंवा बोलण्यात अडचण जाणवणे.
  • दात मोकळे होणे.
  • ज्या जखमा लवकर नीट होत नाहीत.

Teeth Cause Cancer

लक्षात ठेवा या गोष्टी

  • तंबाखू आणि मद्यपान टाळा.
  • दिवसातून 2 वेळा ब्रश करणे गरजेचे आहे.
  • दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणे गरजेचे आहे.
  • सकस आणि संतुलित आहार घ्या.
  • तसेच आठवड्यातून 2-3 वेळा फ्लॉस करावे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या

महत्त्वाच्या बातम्या :

Cancer is a serious disease. According to doctors, if oral hygiene and dental care are not taken regularly, gum inflammation starts.

Health Marathi News

Join WhatsApp

Join Now