Cancer । कॅन्सर हा एक असा आजार आहे, ज्याचे नाव ऐकले तर अनेकांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. अलीकडच्या काळात दातांचे आजारही (Diseases of teeth) खूप वाढले आहेत. काही कारणांवरून देखील कॅन्सर (Mouth Cancer) होण्याची शक्यता आहे.
आपले दात हे आपल्या शरीराचा भाग असल्याने त्याचे सर्वात जास्त संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. तोंडाचे आरोग्य हे केवळ दात आणि हिरड्यांच्या समस्यांपुरते मर्यादित नाही, तर त्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात. (Cancer Symptoms)
Mouth Cancer Symptoms
- तोंडात वारंवार फोड येणे – आपल्या तोंडात वारंवार फोड आले आणि दीर्घ कालावधीसाठी बरे झाले नाही तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.
- तोंडाचा वास – जर तोंडाची दुर्गंधी कायम राहिली तर ते जीवाणूंच्या अतिवाढीचे लक्षण आहे, जे नंतर गंभीर रोगामध्ये देखील बदलू शकते.
- रक्त येणे – ब्रश करताना किंवा काही खाताना दातातून रक्त येत असेल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.
- अन्न चावताना किंवा गिळताना त्रास होणे – जर आपल्याला अन्न चावताना किंवा गिळताना त्रास होत असेल आणि ही समस्या बर्याच दिवसांपासून कायम राहिली तर डॉक्टरांना भेट द्या. नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
करा हे उपाय
- दिवसातून कमीतकमी दोनदा ब्रश करा.
- मद्यपान किंवा धूम्रपान करू नका.
- हिरव्या भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ खा.
- दर 6 महिन्यांनी आपले दात तपासण्यासाठी दंतचिकित्सकाकडे जा.
- अँटी-बॅक्टेरियल माउथवॉश वापरा.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या
महत्त्वाच्या बातम्या :