Santosh Deshmukh । बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने होऊन गेले आहेत. तरीही पोलिसांना कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला पकडण्यात यश येत नाही. यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अशातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “पोलिसांनी आतापर्यंत कृष्णा आंधळेवर कारवाई केली नाही. केज पोलिसांनी सीआयडीकडे (CID) तपास दिल्यानंतर त्यांना कसलीच मदत केली नाही. याउलट आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांच्या टीमने पुढाकार घेतला. आरोपीच आरोपींना वाचवण्यासाठी पुढे आले,” असा दावा धनंजय देशमुख यांनी केला.
“ऍट्रॉसिटी 6 तारखेला नाही तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर 12 तारखेला दाखल केली. जर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती. जे आरोपी शरण आले आहेत, त्यांना VIP ट्रीटमेंटच मिळत नाही तर केसच कमकुवत करण्यासाठी पोलिसच आकाश-पाताळ एक करत आहे,” असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “एसपी चांगले काम करत आहेत. पण खालचे पोलीस कर्मचारी आरोपीच्या बाजूने आहेत. PI महाजन यांना बीड मुख्यालय येथे बदली केली असताना ते केज पोलीस स्टेशनला कसे येतात?,” असा संतप्त सवाल देखील धनंजय देशमुख यांनी केला आहे.
Dhananjay Deshmukh allegation on Beed Police
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर दलावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी मस्साजोगचे नागरिक येत्या 25 तारखेला अन्नत्याग उपोषण करणार आहेत. यामध्ये धनंजय देशमुख यांच्यासह मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील सहभागी होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :