Share

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! नव्या जर्सीसह Mumbai Indians च्या नव्या कर्णधाराची घोषणा

by MHD
Mumbai Indians announce new captain and jersey

Mumbai Indians । मार्च महिन्यापासून आयपीएल (IPL 2025) सुरू होणार असून या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक (IPL Schedule 2025) देखील प्रसिद्ध झाले. येत्या 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाणार आहे.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज असा सामना सुरु होणार आहे. दरम्यान आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉंच झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मागील हंगमात हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) संघाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. मागील हंगामात संघाला केवळ 4 सामने जिंकता आले होते. अशातच आता संघाने पुन्हा पांड्यावर संघाची जबाबदारी सोपवली आहे.

त्यामुळे संघ हार्दिक पांड्याच्याच नेतृत्वात आयपीएलचा 18 व्या हंगामात विजेतेपद जिंकू शकेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. संघाची जर्सी निळ्या आणि सोनेरी रंगछटेतील असून मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर करत जर्सीचे अनावरण केले आहे.

Hardik Pandya Mumbai Indians new captain

“प्रिय पलटण, आम्हाला माहित आहे की गेल्यावर्षीचा हंगाम विसरण्यासारखा होता. पण नव्या हंगामात कसं खेळायचं आपल्यावर अवलंबून आहे. तो चांगला ठरवण्याची संधी आहे. वारसा पुढे नेण्यासाठी 2025 ही आपली संधी आहे. आम्ही मुंबई संघ असल्यासारखे मैदानात खेळू, ही फक्त आमची जर्सी नाही, तर हे तुम्हाला दिलेलं वचनही आहे. चला वानखेडेवर भेटू,” असा भावनिक मेसेज हार्दिक पांड्याने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Before the start of IPL, the new jersey of Mumbai Indians has been launched and its pictures are going viral on social media.

Sports Cricket IPL 2025 Marathi News

Join WhatsApp

Join Now