Share

Manikrao Kokate यांना पुन्हा मोठा धक्का? ‘तो’ परवाना रद्द होण्याची शक्यता

The Nashik District Court has sentenced Manikrao Kokate for tampering and cheating documents in 1995.

by MHD

Published On: 

Manikrao Kokate gun license is likely to cancelled

🕒 1 min read

Manikrao Kokate । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माणिकराव कोकाटे भाऊ सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच त्यांना अवघ्या दोन तासात जामीन मंजूर झाला. न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा सुनावताना त्यांच्या बंदुकीच्या परवानाचे निरीक्षण नोंदविले आहे. दर आठवड्याला 40 ते 50 कामगारांना सुमारे नऊ हजार रुपये रोख पगार द्यावा लागतो.

त्यामुळे ही रक्कम कोकाटे यांनी सुरक्षितपणे हाताळताना संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना (Gun license) देण्याची मागणी मागणी केली होती. त्यावेळी कोकाटे बंधुंचा ऊस कोपरगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये पुरवला जात होता. अशातच आता याच परवान्यामुळे कोकाटे अडचणीत सापडले आहेत.

Manikrao Kokate Gun license

कोकाटे यांचा बंदूक परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, न्यायालयाने सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी कोकाटे यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. निर्णयाविरोधात कोकाटे सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या