Share

वाजपेयींचे सरकार एका मताने कसं पाडलं? Sharad Pawar यांनी पहिल्यांदाच सांगितला ‘तो’ किस्सा

by MHD
Sharad Pawar on Atal Bihari Vajpayee government

Sharad Pawar । ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दिल्लीत महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार केला होता. यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. यावर आता त्यांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे.

“मागील दहा-बारा दिवस संजय राऊतांना (Sanjay Raut) भेटलो नाही. पण सकाळपासून एकच बातमी पाहतोय की, हे दोघं भेटणार. मला काही समजत नाही, एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि जर ते मत एखाद्याने मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही,” असे म्हणत शरद पवार यांनी संजय राऊत यांची पाठराखण केली आहे.

आज निलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्ली येथे पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने कसे पाडले? यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचे सरकार असताना मी विरोधी पक्ष नेता होतो, तेव्हा आम्ही अविश्वास ठराव आणला होता. तो ठराव एकमताने मंजूरही झाला. ते एक मत मी मिळवले होते. ते कसे मिळवले हे सांगत नाही. ठराव मांडला आणि त्यावर चर्चा झाली,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar on Atal Bihari Vajpayee

पुढे ते म्हणाले की, “चर्चा संपल्यानंतर मतदानापूर्वी काही वेळ असत. त्यावेळी मी सभागृहातून बाहेर पडलो आणि परत आलो. यानंतर सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि अवघ्या एका मताने वाजपेयी यांचे सरकार पडले,” असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

How did Sharad Pawar topple Atal Bihari Vajpayee government in 1999 by a single vote? It has been reacted to.

Maharashtra Marathi News Politics