Manoj Jarange Patil । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीही देशमुखांना न्याय मिळाला नाही. याप्रकरणी संतोष देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग या गावच्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह इतर काही नेत्यांनी संतोष देशमुख यांच्यासह महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. अशातच आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग दौऱ्यावर असताना जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांनी बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन करत त्यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
“मस्साजोगचे नागरिक येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहेत. त्यांनी याबाबत निवेदन दिले असेल किंवा नसेल तरी त्यांना सहकार्य करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा आणि आरोपींची सीडीआर काढून कृष्णा आंधळेला अटक करा,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
“चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांना मुभा दिली नाही. बीडचे अर्धे जेल भरले असते, इतकी मोठी टोळी खून आणि खंडणी मागणाऱ्यांची बीडमध्ये आहे. यांना धनंजय मुंडे पोसत आहे,” असा गंभीर आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकर अटक करावी, या मागणीसाठी मस्साजोगचे नागरिक 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) हे देखील सहभागी होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :