Anjali Damania । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या सातत्याने अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
याप्रकरणी दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीदेखील भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आता त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून गंभीर आरोप केले आहेत.
Suraj Chavan post on X
सूरज चव्हाण X वर लिहितात, “धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्ज वाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या “स्वयंघोषित” समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला पुराव्यासह ….लवकरच,” असा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे. सूरज चव्हाण यांच्या आरोपांना दमानिया यांनीदेखील सडेतोड उत्तर दिले आहे.
Anjali Damania post on X
अंजली दमानिया X वर लिहितात, “खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आवाहन. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडी देखील unaccounted आहे का ते पाहावे,” असा सल्ला दमानिया यांनी दिला आहे.
इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना ? योग्य आहे हे? जर महाराष्ट्राच्या मीडिया ला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ह्यावर आजच्या आज प्रतिक्रिया घ्यावी,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
“दोघांही माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी, माझे सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग ह्या सूरज चव्हाण ला योग्य ती शिक्षा द्यावी,” असेही दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.
Anjali Damania on Suraj Chavan
दरम्यान, सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर सूरज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. यामुळे अंजली दमानिया चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :