Anna Hazare । अजित पवार गटाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मागील काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडले आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर पडली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
अशातच आता त्यांच्याविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दंड थोपटले आहेत. “राज्यातील मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना त्यांनी जबाबदारी म्हणून तातडीने राजीनामा द्यावा”, अशी टीका अण्णा हजारे यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली आहे.
“मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याने स्वतःचीच इमेज वाढते. कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार?,” असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे अण्णा हजारे म्हणाले की, “अशा लोकांना मंत्रीमंडळात घेण्यापूर्वी सरकारने विचार करणे आवश्यक आहे. मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध असले पाहिजेत. सुरवातीला हे चुकलं की नंतर अशा घटना घडतात. त्यामुळे राज्याचे, समाजाचे देशाचं नुकसान होते,” असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे.
Anna Hazare on Dhananjay Munde
दरम्यान, आता अण्णा हजारे यांनीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढू शकतो. यावर धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे आता बघावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या :