Walmik Karad । दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही मोकाटच आहे. संपूर्ण राज्यभर शोध घेऊन देखील तो पोलिसांच्या तावडीत सापडत नाही.
त्यामुळे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगचे नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. जर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर येत्या 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन करू, असा इशाराही देशमुख कुटुंबाकडून देण्यात आला आहे.
अशातच आता धनंजय देशमुख यांनी आरोपींबाबत गंभीर आरोप केले आहेत. ” संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. रोज आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे,”असा संशय धनंजय देशमुख यांनी केला आहे.
“आम्ही अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही राज्य सरकारच्या वतीने कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्याची शिष्टमंडळ भेटायला आले नाही. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भेटायला आले,” अशी मनातील खदखद धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
Dhananjay Deshmukh on Walmik Karad
दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आजच त्यांनी मस्साजोग नागरिक आणि देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधत खून आणि खंडणी मागणाऱ्यांना मंत्री धनंजय मुंडे पोसत आहेत,” असा गंभीर आरोप देखील केला.
महत्त्वाच्या बातम्या :