IPL 2025 । आयपीएल 2025 चे वेळापत्रक (IPL 2025 Schedule) जाहीर करण्यात आले आहे. त्यानूसार आजपासून महिन्याभरानंतर आयपीएलच्या हंगामाला सूरूवात होणार आहे. अशातच आता सनरायझर्स हैद्राबादच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) इंडियन प्रिमिअर लीगमध्ये (IPL) पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. हा सनरायझर्स हैद्राबादसाठी (Sunrisers Hyderabad) आयपीएलपूर्वी सुखद धक्का आहे. महत्त्वाचे म्हणजे टीम इंडियाविरुद्ध सिडनी येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातत्याने घोट्याच्या दुखापतीसह गोलंदाजी केली होती.
याच कारणामुळे त्याला श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळता आले नव्हते. पण आता पॅट कमिन्स सध्या दुखापतीतून सावरत आहे. आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर नक्कीच तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतो. याबाबत पॅट कमिन्सने मोठा खुलासा केला आहे.
“आता माझे उदिष्ट हेच असेल की मी पुढील आठवड्यात गोलंदाजी सुरू करेन. मी आयपीएलमध्ये देखील चांगली गोलंदाजी करू शकेन. टी-20 स्पर्धेची चांगली गोष्ट म्हणजे तिची तीव्रता खूप जास्त असते, त्यामुळे नक्कीच थोडीफार मदत होते,” असे पॅट कमिन्सने स्पष्ट केले.
Sunrisers Hyderabad captain Pat Cummins
पॅट कमिन्सबद्दल बोलायचे झाले तर आयपीएल लिलावापूर्वी कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैद्राबाद संघाने १८ कोटी रूपयांत संघात कायम ठेवले असून त्याच्या नेतृत्वात मागील हंगामात संघाने चांगली कामगिरी केली. पण त्यांचा फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात पराभव झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या :