🕒 1 min read
Suresh Dhas । मस्साजोग या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. याप्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका बजावली आहे.
तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर विरोधक निशाणा साधत आहेत. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता त्यांच्या आमदारकीला धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार गटाचे नेते महेबुब इब्राहिम शेख (Mahebub Ibrahim Shaikh) यांनी सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करत निवडणूक याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपीठात धस यांच्या निवडीला आव्हान दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मतदानादिवशी मतदानाचे व्हिडीओ धस यांनी व्हायरल करत शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी करून फॉर्म 17 सी ची प्रत त्यांना दिली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
Suresh Dhas notice issue
सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून पुढील सुनावणी 5 मार्च रोजी पार पडणार आहे. त्यामुळे धस यांची आमदारकी धोक्यात येतेय की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! नव्या जर्सीसह Mumbai Indians च्या नव्या कर्णधाराची घोषणा
- धनंजय मुंडेंविरोधात Anna Hazare मैदानात, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी
-
IPL 2025 पूर्वी सनरायझर्स हैद्राबादसाठी आनंदाची बातमी! ‘हा’ स्टार खेळाडू करणार कमबॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










