Share

“Dhananjay Munde यांच्या घरी नितीन बिक्कडने बोलावली ‘ती’ बैठक”, Suresh Dhas यांचा खळबळजनक खुलासा

Suresh Dhas went to Massajog village and met Santosh Deshmukh’s family. Dhas has made many serious allegations this time.

by MHD

Published On: 

Suresh Dhas criticize Dhananjay Munde

🕒 1 min read

Suresh Dhas । भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये (Santosh Deshmukh murder case) आकाचे आका म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले होते. पण त्यांनी अचानक धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती.

यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवाय मस्साजोग या गावचे नागरिक देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आज सुरेश धस यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

“संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 9 आरोपींवर गुन्हा नोंद झाला असून 10 व्या आरोपीचा देखील या हत्याप्रकरणात सहभाग आहे. धनंजय मुंडे यांच्या घरी नितीन बिक्कड (Nitin Bikkad) यानेच बैठक बसवली आणि त्याने वाशीमधून आरोपींना पळून जायला मदत देखील केली होती. त्यामुळे नितीन बिक्कड यालाही सहआरोपी करावे,” अशी मागणी सुरेश धस यांनी केली. (Suresh Dhas on Dhananjay Munde)

Suresh Dhas on Walmik Karad

“आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. वाल्मिक कराडला (Walmik Karad) जेलमध्ये मटण देण्यात येत आहेत. मोठ्या बॅग नेऊन दिल्या जात आहेत. त्यामुळे आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांचे मित्र आहेत, असा गंभीर आरोप धस यांनी केला.

तसेच “पोलिसांना सहआरोपी करा. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला असून यात 9 आरोपी हे 302 मध्ये 10 व्या आरोपीलाही 302 मध्ये घ्यावे. या हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला देखील अटक करणे गरजेचे आहे,” अशी मागणी धस यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)