🕒 1 min read
Sanjay Raut । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने ते याप्रकरणी राज्य सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असतात. आताही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुंडेंवर निशाणा साधला आहे.
“धनंजय मुंडे यांना जर सर्व रहस्य माहिती आहेत तर त्यांनी सांगावे, सरपंच संतोष देशमुख यांचा खून कोणी आणि कशासाठी केला? बीड जिल्हयाला कोणीही बदनाम करत नाही. तुम्ही स्वतः त्या जिल्ह्याला बदनाम केले आहे. सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही. तुमचं मन तुम्हाला खात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
पुढे ते म्हणाले, ” तुम्ही ज्या टोळ्या पोसल्या, ताकद दिली, गुंडगिरी सुरु केली. खून केले त्याच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे,” असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटू शकते.
Sanjay Raut on Dhananjay Munde
यावर आता धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, बीडमधील बदललेली स्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याची विनंती केली होती, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “अजित पवारांनी एकाला मकोकाच्या कारवाईतून वाचवलं”; Jitendra Awhad यांची खळबळजनक पोस्ट
- काय सांगता! दातांमुळे देखील होऊ शकतो Cancer? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
- Mahayuti Government । पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजी? ‘या’ जिल्ह्यांबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










