Akshay Shinde । बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अक्षय शिंदे याला मुख्य आरोपी ठरवले होते. परंतु त्याचा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) करण्यात आला होता.
अक्षयच्या एन्काऊंटरवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याचा एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. (Akshay Shinde Encounter Update)
मुंबई हायकोर्टाकडून याप्रकरणी पाच पोलिसांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या पोलिसांवर राज्य सरकार काय कारवाई करते? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
Update on Akshay Shinde Encounter
यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अक्षयचा एन्काऊंटर झाला त्यावेळी म्हटलं होतं की, हा एन्काऊंटर फेक आहे. ही हत्या आहे. सत्य बाहेर आल्याबद्दल मी कोर्टाचे आभार मानते,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :