Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. याप्रकरणातील अजूनही एक आरोपी फरार आहे. त्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Santosh Deshmukh murder update)
केज – मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट शिजला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत हॉटेलच्याच मालकाने माहिती दिली आहे.
8 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये सहा ते सात जण आले होते. त्यांनी दोन गावरान चिकन हंडी ऑर्डर केल्या. ते अर्धा ते पाऊण तास हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेल मालकाने तपास अधिकाऱ्यांना हॉटेलचे सीसीटीव्ही देखील दिले आहे.
Santosh Deshmukh murder case update
दरम्यान, 25 जानेवारीला राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून मुंबईत जनआक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान यामार्गावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :