Dhananjay Munde । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. सातत्याने विरोधक त्यांचा राजीनामा मागत आहेत.
अशातच आता ठाकरे गटाचे नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “वाल्मिकी टोळी ही राक्षसी प्रवृत्तीची टोळी असून धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर येऊन सांगितले होते की वाल्मिक कराड माझा अतिशय जवळचा मित्र आहे. मुंडे हे वाल्मिक कराडला (Walmik Karad) वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप देशमुखांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याची हकालपट्टी करण्याचे अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना असतात. ही एक टोळी असून माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, संपूर्ण राज्याला तुमच्याकडून अपेक्षा आहे. ते स्वत:हून राजीनामा देणार नाही. त्यामुळे तुम्ही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,” अशी मागणी देखील देशमुखांनी केली आहे.
Nitin Deshmukh demand Dhananjay Munde resign
दरम्यान, नितीन देशमुखांच्या या मागणीवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय निर्णय घेतात? तसेच विरोधकांच्या इतक्या आरोपानंतर धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :