Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदेखील न्यायालायने पुढे ढकलली आहे. अशातच आता वाल्मिक कराडला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) याच्यावर मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काल याप्रकरणी सोलापूर न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, जिल्हा-सत्र न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.
आज याबाबत पोलिसांनी फिर्याद दाखल करावी का नाही? सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय आदेश देणार आहे. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालायने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर वाल्मिक कराड याच्या मुलाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
Big blow to Walmik Karad
दरम्यान, वाल्मिक कराडची राज्यात विविध ठिकाणी करोडो रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. यावर ईडी कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर ईडीने त्याची संपत्ती जप्त केली तर त्याला मोठा धक्का बसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :