Share

“अजित पवारांची मिटिंगला दांडी अन् शरद पवार रागाने निघून गेले”; Chhagan Bhujbal यांनी सांगितला पहाटेच्या शपथविधीचा ‘तो’ रंजक किस्सा

MLA Chhagan Bhujbal of Ajit Pawar faction has also made a secret blast over the early morning swearing-in ceremony.

by MHD

Published On: 

Chhagan Bhujbal on early morning oath ceremony

🕒 1 min read

Chhagan Bhujbal । नुकताच अजित पवार गटाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत एक खळबळजनक दावा केला होता. अशातच आता पहाटेच्याच शपथविधीवरून आमदार छगन भुजबळ यांनीदेखील एक गौप्यस्फोट केला आहे.

“शिर्डी येथे अधिवेशनात धनंजय मुंडे म्हणाले होते की ते षडयंत्र होतं. पण हे षडयंत्र कोणी रचलं? उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेस देखील असं करू शकत नाही. मग हे षडयंत्र कोणी रचलं? मला एवढं आठवतं की, त्यावेळी काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू होत्या. बैठकीवेळी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये वाद झाला, त्यामुळे शरद पवार रागाने निघून गेले होते,” असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

“त्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग सुरू होत्या. राष्ट्रवादीची बैठक सुरु होती पण त्याला अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नव्हते. ते कुठेतरी अडकले होते आणि दुसऱ्या दिवशी टीव्ही पाहतो तर काय? अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. आपण पुन्हा तयारीला लागू, असे त्यावेळी आमचं ठरलं होत असेही छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal statement on early morning oath ceremony

पुढे ते म्हणाले की, “आम्ही आमदारांची जुळवाजुळव करत होतो. अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांना मी सांगितले की असे काही करू नका. पण दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल आला. निकालानंतर देखील आम्ही त्यांना सांगितलं तुमची पुढची वाटचाल फार कठीण झाली आहे. तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत या, आणि त्यांचे पुन्हा पक्षात स्वागत करण्यात आले” असे भुजबळ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)