Nawab Malik । राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे. मलिक यांच्या विरोधातील तक्रारीवर मुंबई न्यायालयाने पोलीस चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मलिक यांच्या विरोधात केंद्रीय महसूल खात्यातील अधिकारी आणि एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बहिण यास्मिन वानखेडे (Yasmin Wankhede) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल आता वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आशिष आवारी यांच्या न्यायालयाकडून घेण्यात आली आहे.
मलिक यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना आपल्याविरुद्ध खोटे, बदनामीकारक आणि निंदनीय आरोप केला असल्याची तक्रार यास्मिन वानखेडे यांनी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अन्वये चौकशीचे आदेश दिले आहेत.
Defamation complaint against Nawab Malik
तसेच याप्रकरणी महिन्याभरात तपास करून चौकशी अहवाल 15 फेब्रुवारी रोजी सादर करावा, असे देखील आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. यावर आता मलिक काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- मल्टिटॅलेंटेड Sushant Singh Rajput..! 99% लोकांना जमणार नाही असे दोन्ही हातांनी करायचा कठीण काम
- “अजित पवारांची मिटिंगला दांडी अन् शरद पवार रागाने निघून गेले”; Chhagan Bhujbal यांनी सांगितला पहाटेच्या शपथविधीचा ‘तो’ रंजक किस्सा
- Pankaja Munde यांनी सांगितले देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट न घेण्याचे कारण; म्हणाल्या, “तो माझा वैयक्तिक…”