Rohit Pawar – भाजपला सांगकामे नेतृत्व आवडतं; रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं

Rohit Pawar Comment On Ajit Pawar over Nawab Malik entry in Mahayuti government

Rohit Pawar –  नवाब मलिकांवरून महायुतीत वाद होत असल्याचे चित्र आहे. मालिकांना महायुतीत  घेऊ नका असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना ( Ajit Pawar ) दिले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजप, शिंदे गटाची कोंडी झाली आहे. अशात आता रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अजित पवारांना ( Ajit Pawar ) डिवचलं आहे. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व पाहिजे असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार ( Rohit Pawar ) ट्विट करत म्हणाले, प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटतं. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडतं. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला लोकनेता भाजपच्या रणनीतीचा शिकार होत आहे, याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे!

स्वतःच्याच सहकाऱ्यांची बाजू घेताना अजित पवार ( Ajit Pawar ) अडखळत आहेत, भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व पाहिजे त्यांच्याकडून लोकनेते संपवले जात असल्याचा आरोप त्यांनी ( Rohit Pawar ) भाजपवर केला आहे.

नवाब मलिकांबाबतच्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर संजय राऊतांचा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या पत्रावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. त्यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं. अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे.. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी… जात मांजराची…, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.