Devendra Fadnavis | जेलमध्ये कैद्यांना मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; फडणवीस सरकारचा निर्णय

Maharashtra prisoners get ice creams, gol gappas And Lonavala chikki

Devendra Fadnavis | जेलमध्ये शिक्षा घेत असलेल्या ललित पाटील हा दर महिन्याला 17 लाख उडवत होता. जेल मधील प्रशासनाला हाताशी धरुन ललित पाटील त्याच्या मैत्रिणीसोबत लेमन ट्री हॉटेलमध्ये ऐश करत असल्याचे आता उघड झालेलेच आहे.

निवडणुका जवळ आल्या कि गुन्हेगारांना जामीन मिळतो असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो. आता त्याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकारने अधिकृतपणे जेलमध्ये कैद्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम मिळणार असलचे पत्रक काढले आहे. सोबत चाट मसाला, लोणचं, ताजं पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, शुगर फ्री स्वीटनर, आईस्क्रीम, सेंद्रिय फळं, पीनट बटर, पाणीपुरी, आर्ट बुक्स, फेस वॉश, कलरिंग मटेरियल या वस्तूंची यादी करण्यात आली आहे.

तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर पडली आहे. हा निर्णय कैद्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

कैद्यांना विविध अन्न पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी दिलीये.

कैद्यांना कारागृहातून कुटुंबीय आणि वकिलाशी आठवड्यातून फोन वरून दहा मिनिटे बोलण्याची सवलत लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आहे.

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट कार्ड देऊन नातेवाईक आणि वकिलाशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटे फोन वर बोलण्याची सवलत देण्यात आली होती, लवकरच महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये कैद्यांना हि सवलत मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.