Share

Jitendra Awhad | नवाब मलिक अजित पवार गटात जाणार? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) जेलमध्ये असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली.

राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हा मलिक जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना काही दिवसांसाठी जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

या चर्चा सुरू असताना नवाब मलिक अजित पवार गटासोबत जाणार असल्याचं राज्यकीय वर्तुळात बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I don’t want to talk about this – Jitendra Awhad

पत्रकार परिषदेत बोलत असताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना नवाब मलिक यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचे उत्तर देत आव्हाड म्हणाले, “मला या विषयावर बोलायचं नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे.

मला या विषयांशी काही घेणं-देणं नाही. कोण कोणत्या केबिनमध्ये बसणार? याच्याशी माझा काही संबंध नाही.”

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती.

निवडणूक आयोगाने काल या याचिकेवर सुनावणी घेतली आहे. आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा अजित पवार गटानं या सुनावणी दरम्यान केला असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकूण 53 आमदार आहेत. 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्यासोबत असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.

यानंतर अजित पवार गटाला पाठिंबा देणारे 42 वे आमदार नवाब मलिक असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) जेलमध्ये असताना अजित पवार (Ajit …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now