Sanjay Shirsat | संजय राऊत घणाघाती नाही, तर घाण शब्द वापरतात – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.

राज्य शासनाच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. दिल्लीतील लोक तो नाडा कधीही सोडतात आणि कधीही ताणतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत घणाघाती नाही तर घाण बोलतात, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत यांनी घणाघाती नाही तर घाण शब्द वापरले आहे.

संजय राऊत यांना लोकांचं खाली वाकून बघायची सवय झाली आहे. बरं झालं संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा फक्त बेल्ट बघितला.

अजून काय बघितलं याबाबत ते मीडियासमोर बोलले नाही. सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत असतं. सरकारमधील प्रमुख नेतृत्व सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर काम करत असतात.”

Fools like Sanjay Raut will not know this – Sanjay Shirsat

पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय राऊतसारख्या मूर्खांना हे कळणार नाही. ईडी वगैरे विषयांवर ते बोलत बसतात. त्यांच्यावर कारवाई होणार आहे, म्हणून ते हे विषय काढत असतात.

संजय राऊत यांच्यासारख्या नालायक माणसाने केलेल्या टीकेला आम्ही जास्त महत्त्व देत नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) डमरू वाजवतात आणि अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाचतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

फडणवीस जेव्हा डमरू वाजवत होते, तेव्हा ही लोकं फुगड्या खेळत होती का? घर का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी संजय राऊत यांची अवस्था झाली आहे.”

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली. “राज्य सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीला आहे. ती लोक तो नाडा कधीही ताणतात आणि कधीही सोडतात.

त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सातत्याने दिल्लीला पळत असतात. देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार माकडासारखे त्या तालावर नाचत असतात.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.