Nawab Malik | नवाब मलिक अजित पवारांसोबत जाणार? ठरणार दादा गटाचे 42 वे आमदार

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Nawab Malik | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली, तेव्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जेलमध्ये होते.

नवाब मलिक जेलमध्ये असताना राष्ट्रवादीत फूट पडली. वैद्यकीय कारणामुळे मालिकांना काही महिन्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा दर्शवणार?

याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असताना नवाब मलिक अजित पवार गटासोबत जाणार असल्याचं राज्याच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Out of 53 MLAs, 42 MLAs are with us – Ajit Pawar Group

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काल सुनावणी घेतली आहे. या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा केला असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्यासोबत आहे, असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.

अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवणारे 42 वे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) असल्याच्या चर्चा यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

दरम्यान, या चर्चा सुरू असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या बद्दल मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांवर लोकांचा विश्वास बसला आहे.

येत्या काळात अजित पवार आपली कामं करू शकतात, त्याचबरोबर ते आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतात, असा लोकांचा विश्वास बसला आहे. जसं-जसं 2024 जवळ येईल तसं-तसं अजित पवारांना पुन्हा एकदा समर्थन मिळेल.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe