Sushma Andhare | दिवस, वेळ, ठिकाण ठरवा, मी निशस्त्र एकटी यायला तयार; सुषमा अंधारेंचं मनसेला खुल आव्हान

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sushma Andhare | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये नुकताच गणेश विसर्जन सोहळा पार पडला आहे. गणेशोत्सवात वाजवण्यात आलेल्या डीजे आणि डॉल्बीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली होती.

सलग 24 तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का?, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

राज ठाकरे यांच्या या टीकेवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली, त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय, म्हणून हा बडा नेता भाष्य करेल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं.

यानंतर सुषमा अंधारे यांना शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी धारेवर धरलं होतं. मनसे महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. शालिनी ठाकरे यांच्या या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I am ready to come unarmed alone – Sushma Andhare

ट्विट करत सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “भडकले..गुर्गुरले..dj…जाळ..डरकाळी..अरे बापरे.. बाई, ठिकाण , वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे.

पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगर चे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय?”

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर शालिनी ठाकरे यांनी अंधारे (Sushma Andhare) यांना धारेवर धरलं होतं.

“अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही”, असं शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe