PM Kisan Yojana | केंद्र सरकारला मोठा झटका! पीएम किसान योजनेत आढळले तब्बल अडीच कोटी बोगस शेतकरी

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते.

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देते.

प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र सरकारच्या या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Central Government has started Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana from 24 February 2019

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत तब्बल अडीच कोटी बोगस शेतकरी आढळून आले आहे.

2021 -22 मध्ये 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांचा आढावा घेतला असता ही संख्या 8 कोटी 51 लाख आढळून आली आहे. या योजनेत अडीच कोटी लाभार्थी बनावटी आढळून आले आहे.

दरम्यान, या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी या https://pmkisan.gov.in वेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

त्याचबरोबर प्रधानमंत्री योजनेत शेतकऱ्यांना कोणत्याही समस्या आढळून आल्या तर शेतकरी त्यांच्या समस्या pmkisan-ict@gov.in या ईमेलवर नोंदवू शकतात.

या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी या 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 क्रमांकावर संपर्क करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.