Chitra Wagh | तुमच्या भ्रष्टाचारामुळे रेड्यांची पलटण राज्याच्या मानगुटीवर बसली; चित्रा वाघांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या एक यमाचा रेडा फिरत आहे आणि त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री स्वार झाले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या भ्रष्टाचारामुळे रेड्यांची पलटणच राज्याच्या मानगुटीवर बसली आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना धारेवर धरलं आहे.

ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “कोरोना काळात तुमच्या (संजय राऊत) भ्रष्टाचारामुळे रेड्यांची आख्खी पलटणच महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसली होती; यमाला ओव्हरटाईम करावा लागत होता.

तुमचे त्यावेळचे रेडेस्वार आम्ही खडी फोडायला पाठवलेच आहेत. लवकरच त्यांच्या बोलवित्या धन्यांच्याही मुसक्या आवळू.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातला तो रेडा आता असला असता, तर रेड्यामुखी वेद वदवण्याऐवजी तुमच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या त्याच्या तोंडातून बाहेर पडल्या असत्या.”

More than 100 people have died in Maharashtra in the last four days -Sanjay Raut

दरम्यान, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.

ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये गेल्या चार दिवसात नक्षलवादी हल्ल्याशिवाय 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनाला हा गंभीर विषय जर अस्वस्थ करत नसेल तर त्यांचं मन आणि हृदय मेलेलं आहे, असं मला वाटतं.

मन की बात ऐकायला ते दिल्लीला जातात. मात्र, त्यांना नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेला जनतेचा आक्रोश ऐकू येत नाही. राज्यात एक यमाचा रेडा फिरत आहे. त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe