Shalini Thackeray | “…तर मनसे तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजल्याशिवाय राहणार नाही”; शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Shalini Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: नुकताच गणेश उत्सव पार पडला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावर भाष्य केलं आहे.

24 तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.

एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली, त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय, म्हणून हा बडा नेता भाष्य करेल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं.

सुषमा अंधारे यांच्या या टीकेला शालिनी ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Rajsaheb took a firm stand that Hindu festivals should be celebrated with enthusiasm – Shalini Thackeray

सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला शालिनी ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शालिनी ठाकरे यांनी पत्र पाठवत सुषमा अंधारे यांना इशारा दिला आहे. या पत्रात शालिनी ठाकरे म्हणतात, “प्रिय अंधारे बाई,

हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा जावा याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला.

महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला स्वती नसल्याचे दिसत. सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगलबच्चे शांतच आहेत.

अशा वेळी फक्त मनसे आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणुनच राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात.

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच काही दिवसांपूर्वी तुमच्या गटप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते. मग तुमच्या सारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतीला यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते.

शिल्लक सेना प्रमुख आज काल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणुन आपण नैराश्येत आहात. त्यातूनच संबंध नसताना आपण राजसाहेबांच्या नातवाला या राजकारणात ओढले. हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे.

या बाबत आपण खरंतर जाहीर माफी मागितली पाहिजे. पण आमच्या देव देवतांचा, आमच्या संतांचा अपमान करणान्या तुम्ही. त्यामुळे आम्ही आपल्याकडून ही सुसंस्कृत अपेक्षा करणेब चूक आहे. आपल्याला ही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली, तर ती तुमच्या मनाला रुचतील का ?

अंधारे बाई या पुढे याद राखा संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही. या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe