Aditya Thackeray | “अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तर करा, पण…”; आदित्य ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं

Aditya Thackeray | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांना पाच वर्षे पूर्ण काळासाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मूळ लोक 25 वर्षापासून ज्या लोकांच्या विरोधात लढले त्यांना बाजूला करून आता या लोकांना तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ करत आहात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

BJP leaders have been fighting against these people for the past 25 years – Aditya Thackeray

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “तुम्हाला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर करा. मात्र, भाजपचे मूळ कार्यकर्ते गेल्या पंचवीस वर्षापासून याच लोकांच्या विरोधात लढत आहे.

त्या लोकांना बाजूला करून तुम्ही यांना वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ करत आहात. प्रमोद महाजन, धनंजय मुंडे या भारतीय जनता पक्षातील जुन्या लोकांना तुम्ही काय उत्तर देणार आहात?

दरम्यान, राज्यातील शासकीय रुग्णालयाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “सुविधांअभावी शासकीय रुग्णालयात लोकांचा जीव जाताना सरकारमध्ये बॉस कोण याची स्पर्धा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात : महाराष्ट्रात “भाजप बॉस” आहे. शिंदे गटाचे मंत्री म्हणतात: महाराष्ट्रात “एकनाथ शिंदे बॉस” आहे. सत्तेच्या अहंकारात बेधुंद झालेल्या दोघांनाही कुणीतरी सांगा की महाराष्ट्रात जनताच “बॉस” आहे.

महाराष्ट्राची जनता हीच खरी बॉस आहे, जी यांचा अहंकार २०२४ मध्ये उतरवल्या शिवाय राहणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.