Chitra Wagh | राऊतांच्या संगतीत उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालंय – चित्रा वाघ

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आज (05 ऑक्टोबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

दिल्लीने देवेंद्र फडणवीस यांचं मातेरं पोतेरं केलं आहे, त्यामुळं आम्हाला त्यांची दया येते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांच्या संगतीत उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालंय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Under the leadership of Devendraji, we have not had any problems at all – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमचं अजिबात मातेरं झालेलं नाही. उलट, तुमच्या संगतीत उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालंय.

मोठ्या भावाचं मोठेपण तुम्हाला खुपत होतं; घराचं कारभारीपण आपल्याकडे न जाता मोठ्या भावाकडंच जाणार, या असूयेपोटी तुम्ही त्याच्या पाठीत खंजीर खुपसलात. वेळ येताच मोठ्या भावाने या दगाबाजीचं व्याजासहित उट्टं काढलं.

तेव्हापासून हा एके काळचा धाकटा भाऊ भ्रमिष्टासारखा बडबडत असतो. मोठा भाऊ मात्र जमिनीवर घट्ट पाय रोवून कुटुंबाला आधार देत ठामपणे उभा आहे.

देवेंद्रजींना खोटारडा म्हणण्याचे माकडचाळे करणं म्हणजे काजव्याने सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळे ही थुंकी पडणार ती तुमच्याच अंगावर… तुम्ही तर त्या घाणीत अगोदरच पुरते बरबटलेले आहात.”

दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते. मात्र, ते आज त्यांच्या बाजूला जाऊन बसले आहे.

त्यांनी या विषयावर बोलायला हवं. पण, ते आमच्यावर आरोप करत बसले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा अपमान करून घेतला आहे. त्याचबरोबर दिल्लीने त्यांचं मातेरं आणि पोतेरं केलं आहे. त्यामुळं आम्हाला त्यांची दया येते.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.