Pravin Darekar | खोट्या मनुवृत्तीच्या उद्धव ठाकरेंचे समर्थन करताना संजय राऊतांचा रोज पोपट होतो – प्रवीण दरेकर
Pravin Darekar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस सिंचन घोटाळ्यातील आरोपी म्हणून अजित पवारांना चक्की पिसींग म्हणतं तुरुंगात टाकणार होते. मात्र, ते आता त्यांच्या बाजूला जाऊन बसले आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांच्या या टीकेला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खोट्या मनुवृत्तीच्या उद्धव ठाकरेंचे समर्थन करताना संजय राऊतांचा रोज पोपट होतो, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
Who is calling Devendra Fadnavis a liar? – Pravin Darekar
ट्विट करत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना खोटारडा कोण म्हणतोय?
… तर ज्याने कोविडमध्ये लोकांच्या मृत्युतून सुद्धा दलाली खाल्ली,
… ज्याने पत्राचाळ घोटाळ्यातून अनेक गरिबांच्या घशातील घास आपल्या घशात घातला.
… ज्याने शिवसेनेची वाट लावली
… ज्याने राष्ट्रवादीची सुद्धा वाट लावली
… जो आरोप खुद्द शरद पवार नाकारू शकत नाहीत, तेथे तुमची काय गत?
… खोट्या आणि कोत्या मनुवृत्तीच्या उद्धव ठाकरेंचे समर्थन करताना तुमचा रोज पोपट होतो. स्वतःचेच आणखी पतन करणार?”
दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
“सिंचन घोटाळा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकणार होते. त्याचबरोबर शिंदे गटातील 25 पेक्षा जास्त नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. हे सर्व लोक देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला जाऊन बसले आहे.
त्यांनी त्यांच्या विषयी बोलायला हवं. परंतु, ते आमच्यावर आरोप करत आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःचा अपमान करून घेत आहे. दिल्लीने त्यांचं मातेरं आणि पोतेरं केलं आहे. म्हणून आम्हाला त्यांची दया येते.
2024 नंतर एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना देखील राजकीय दृष्ट्या मोठा धक्का लागणार आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | आम्हाला देवेंद्र फडणवीसांची दया येते – संजय राऊत
- Jayant Patil | सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे-फडणवीस नक्की कोणाची प्रगती करणार होते? – जयंत पाटील
- Supriya Sule | जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे
- Uddhav Thackeray | निष्पक्ष रहा, सुडाने कारवाया करू नका; ठाकरे गटाचा केंद्र सरकारला इशारा
- Uday Samant | वाघ नखं जवळून बघितल्यावर काय झालं? उदय सामंत म्हणाले…