Sanjay Raut | आम्हाला देवेंद्र फडणवीसांची दया येते – संजय राऊत

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना धारेवर धरलं होतं. चक्की पीसिंग म्हणत देवेंद्र फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकणार होते.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची दया येते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Mr. Devendra Fadnavis is dishonoring himself – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सिंचन घोटाळ्यातील आरोपी म्हणून देवेंद्र फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकणार होते. ते आता त्यांच्या बाजूला जाऊन बसले आहे.

त्याचबरोबर शिंदे गटातील 25 पेक्षा जास्त नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहे. ते देखील तुमच्या बाजूला बसले आहे. तुम्ही त्यांच्याविषयी आधी बोला. भूतकाळात काय घडलं याबाबत तुम्ही चर्चा करा. तुम्ही काय आमच्यावर आरोप करत आहात.

मि. फडणवीस स्वतःचा अपमान स्वतः करून घेत आहे. फडणवीसांचं दिल्लीने मातेरं आणि पोतेरं केलं आहे. त्यामुळे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची दया येते.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहे. कोर्ट आणि विधिमंडळ अध्यक्षांनी कायदेशीर निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे पाच वर्ष काय पाच मिनिटे सुद्धा मुख्यमंत्री पदावर राहू शकत नाही.

त्यांना बेकायदेशीरपणे या पदावर बसवलं आहे. ते जर कायद्याने वागले तर अजित पवारांची आमदारकी देखील जाऊ शकते. 2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना देखील राजकीय दृष्ट्या मोठ्या धक्का बसणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe