Vijay Wadettiwar | भाजपला आमदार फोडायला वेळ आहे, मात्र रुग्णालयात भरतीसाठी वेळ मिळत नाही – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar Vijay | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.

BJP Chanakya gets time to supply MLAs, collect and break – Vijay Wadettiwar

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “भाजप चाणक्यला आमदार पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा आणि भरती करायला वेळ नाही.”

“नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबिय धाय बोकलून रडत होते. नवजात बालकांचा काय दोष आहे? माणुसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेनशीलतेने हे सगळं पाहू शकत नाही.

जे कुटुंब उध्वस्त झाले त्यांना सरकारने आतातरी माणुसकी दाखवत प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत तातडीने द्यावी”, असंही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत.

ठाण्यातील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 27 मृत्यू, नांदेडमध्ये एकाच दिवसात 24 मृत्यू, काल घाटी (संभाजी नगर) येथे जवळपास 20 जणांचा मृत्यू, तर आज नागपूरमध्ये 24 तासात 25 जणांचा मृत्यू. इतक्या भयंकर घटना घडत आहेत.

यावर हे ट्रीपल इंजिनच राज्य सरकार आणि संबंधित खात्याचे मंत्री अवाक्षर काढायला तयार नाहीत. या रुग्णालयात पुरेश्या सुविधा नाहीत, स्टाफ ची कमकरता आणि औषधांचा पडलेला दुष्काळ गोर गरीब रुग्णांच्या जीवावर बेततो आहे.

राज्यातील फक्त शासकीय रुग्णालयेच नाही तर हे ट्रीपल इंजिन सरकार देखील वेंटीलेटर वर असल्याचं दिसून येत आहे. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील राज्य सरकार या राज्याने वीजकधीच अनुभवलेले नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.