Ajit Pawar | अखेर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! अजित पवारांना मिळाली पुण्याची जबाबदारी

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नव्हता. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याकडे कोणतेही पालकमंत्री पद नव्हतं.

यावरून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना झाले होते.

त्यांच्या या दौऱ्यानंतर राज्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असल्याचं बोललं जातं आहे. अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री पद तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे.

Eknath Shinde has announced the revised list of guardian minister post

आज (04 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे:

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील

अमरावती – चंद्रकांत दादा पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.