Share

Rohit Pawar | सरकारच्या निष्काळजीपणामुळे जग पाहण्यापूर्वीच 12 निष्पाप जिवांनी डोळे मिटले – रोहित पवार

🕒 1 min read Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. जन्म घेऊन फक्त 24 ते 48 तास झालेल्या चिमुकल्यांचा या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. जन्म घेऊन फक्त 24 ते 48 तास झालेल्या चिमुकल्यांचा या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

अशात आता या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे जग पाहण्यापूर्वीच 12 निष्पाप जिवांनी डोळे मिटले असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Life is not worth any amount of money – Rohit Pawar 

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “ही बातमी म्हणजे सरकारच्या निष्काळजीपणाचा ढळढळीत पुरावा आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे जग पाहण्यापूर्वीच 12 निष्पाप जिवांनी डोळे मिटले…

आतातरी सरकारने डोळ्यावरील झापडं दूर करून क्रूरपणे घेतलेल्या या बळींची जबाबदारी स्वीकारावी आणि संबंधित मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवावा..

उद्या भरपाई म्हणून बळी गेलेल्या कुटुंबाला तुम्ही काही लाख रुपये द्यालही.. पण जीवाची किंमत कितीही पैशांमध्ये होत नसते, म्हणून अशा घटना घडू नयेत यासाठी निष्काळजीपणा न दाखवता सरकारने काम करायचं असतं.”

दरम्यान, या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. “भय इथले संपत नाही आणि कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाही. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर आता नागपूरात देखील २५ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. त्यांना कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत.

औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय”, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही