Ajit Pawar | अजित पवारांच्या गैरहजेरीत चर्चा; शिंदे-फडणवीस दिल्लीत दाखल

Ajit Pawar | नवी दिल्ली: काल (3 ऑक्टोबर) मुंबईमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.

मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. त्यांची तब्येत बरी नसल्याचं कारण सांगून अजित पवार त्यांच्या देवगिरी बंगल्यावरच होते. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिलेल्या रवाना झाले आहे.

या बैठकीला अजित पवार अनुपस्थित राहणार आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्क लावले जात आहे.

Ajit Pawar was not present at the cabinet meeting held yesterday

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नव्हते. अजित पवारांची तब्येत बरी नसल्याने ते या बैठकीला अनुपस्थित होत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीचा वेगळा अर्थ काढू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.

तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘राजकीय आजार’ अशी प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार यांच्या गैरहजेरीचा चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहे.

त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्याही मंत्र्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही, म्हणून अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

या विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना झाले असल्याच्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान, काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “ट्विट करत एकनाथ शिंदे म्हणाले, “#मंत्रिमंडळ_निर्णय…

✅ दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.

✅ विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.

✅ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.

✅ नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.

✅ इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.