Share

Eknath Shinde | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेण्यात आले? CM शिंदे म्हणतात…

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आज (03ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी शासकीय रुग्णांमध्ये दगावलेल्या रुग्णांच्या प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ट्विट करत एकनाथ शिंदे म्हणाले, “#मंत्रिमंडळ_निर्णय…

✅ दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.

✅ विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.

✅ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.

✅ नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.

✅ इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा.”

24 patients have died in the government hospital in Nanded in 24 hours

दरम्यान, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, “नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ त्या ठिकाणी पोहोचले आहे.

त्या ठिकाणी हे मृत्यू कसे झाले? याबाबत महाजन आणि मुश्रीफ माहिती घेणार आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये घडलेल्या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. त्या शासकीय रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारची औषधांची कमी नव्हती.

रुग्णालयातील औषधांसाठी 12 कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. आम्ही या घटनेचा आढावा घेत आहोत.”

महत्वाच्या बातम्या

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आज (03ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now