Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
7 more deaths have occurred in the Nanded hospital – Aditya Thackeray
ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण घटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय.
२ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय.
महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही. अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही!”
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहेत. “राज्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दररोज असंख्य रुग्णांचा मृत्यू औषध तुटवडया मुळे होत आहेत आणि ‘रुग्णालयात प्रशासन सांगत आहे की औषध तुटवडा नाहीये ‘ असा अजब दावा करून हे सरकार नक्की कुणाला वाचवत आहे?
काल नांदेड येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 24 रुग्ण दगावले होते त्यात परत एका रात्रीत अजून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही? – संजय राऊत
- Nana Patole | नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे – नाना पटोले
- Raj Thackeray | सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी – राज ठाकरे
- Uddhav Thackeray | भाजप म्हणजे भांडवलदार, व्यापारी आणि गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष; ठाकरे गटाचं टीकास्त्र
- Devendra Fadnavis | राष्ट्रवादी आणि शिवसेनासोबत आले तरी भाजपच बॉस – देवेंद्र फडणवीस