Devendra Fadnavis | राष्ट्रवादी आणि शिवसेनासोबत आले तरी भाजपच बॉस – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप येऊन गेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीचा समावेश आहे.

या दोन्ही नेत्यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन गट पडले आहे. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज दादर येथे भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपल्यासोबत सत्तेत सहभागी झाले असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप, शिंदे आणि पवारांमध्ये नवीन वाद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येईल?

याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर त्यांच्या या विधानाचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis should become the Chief Minister of Maharashtra – Nitesh Rane

दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, “प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपला नेता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. मात्र, खरे मुख्यमंत्री ठरेपर्यंत खूप वाद आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजे, ही भारतीय जनता पक्षातील प्रत्येक नेत्याची भावना आहे. मात्र, हा निर्णय तेव्हाच्या राजकीय परिस्थितीनुसार ठरणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.