Chitra Wagh | काही वाघांनी मिशांवर मारला ताव पण, बोलायला उघडलं तोंड तेव्हा बाहेर पडलं म्याँव; चित्रा वाघांनी ठाकरेंना डिवचलं

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सध्या राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यातील मंत्री सामान्य जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यामध्ये काही महिन्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं आणली जाणार आहे. यावरून देखील आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाने राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. या सर्व प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे.

Who is the fake tiger? – Chitra Wagh 

ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “एकदा काही वाघांनी
ऐटीत मिशांवर मारला ताव
पण, बोलायला उघडलं तोंड
तेव्हा बाहेर पडलं म्याँव..

पट्टे होते रंगवलेले
अंगावर नव्हती फर
वाघाचं कातडं ओढून
सोंग आणलं मात्र जबर

डौल दाखवत खोटा
टाकली चार पावलं
चालून किती चालणार
काँग्रेसचं हे बाहुलं ?

मांजरंसुद्धा फिसकारली
शेजारी यांना पाहून…
ओळखा पाहू तुम्हीच
हे नकली वाघ कोण ?

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं काही महिन्यांसाठी लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस यांना धारेवर धरलं आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणत असल्याचा गाजावाजा मिंधे-भाजप सरकारनं केलाय. पण ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा आता इतिहास संशोधक संदर्भानिशी करतायत.

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या संदर्भातील कोणतीही गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह तसेच पवित्र आहे. पण महाराजांची वाघनखं असल्याचं दाखवून मिंधे-भाजप सरकार काहीही खपवणार असेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणार असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही.

ही वाघनखं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर त्याचे तसे रेकॉर्ड लंडनच्या म्युझियममध्ये का नाहीत? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर मग ती भाड्याने का आणताय?”, असं ठाकरे गटानं ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe