Nitesh Rane | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं बनले पाहिजे – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

अशात भाजप नेते नितेश राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले पाहिजे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “प्रत्येक पक्षाला असं वाटत आहे की आपला नेता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. मात्र, खरे मुख्यमंत्री ठरेपर्यंत खूप मारामारी आहे.

उद्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजे, ही भारतीय जनता पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. परंतु, हा निर्णय राजकीय परिस्थितीनुसार ठरणार आहे.”

There was a discussion between the Chief Minister and the Deputy Chief Minister for two hours

दरम्यान, शनिवारी (30 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची एक बैठक पार पडली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप आणि शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांवर दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. तर सत्तेत नव्याने सामील झालेल्या मंत्र्यांकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही.

याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.