Nana Patole | नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे – नाना पटोले

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, नांदेड येथे 24 तासांत 24 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांवर (Ajit Pawar) टीकास्त्र चालवलं आहे. अशात आता या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

The health system in the state has completely collapsed – Nana Patole

ट्विट करत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “राज्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दररोज असंख्य रुग्णांचा मृत्यू औषध तुटवडया मुळे होत आहेत आणि ‘रुग्णालयात प्रशासन सांगत आहे की औषध तुटवडा नाहीये ‘ असा अजब दावा करून हे सरकार नक्की कुणाला वाचवत आहे ?

काल नांदेड येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 24 रुग्ण दगावले होते त्यात परत एका रात्रीत अजून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.”

दरम्यान, या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले.

ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे.

मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ?

दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe